Ad will apear here
Next
कमला कॉलेजमध्ये योगदिन साजरा
कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये २१ जून रोजी जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. या दिनाचे उद्घाटन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार रंगराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्राचार्य डॉ. जे.बी. पाटील, प्रा. डॉ. सुनीता काळे, प्रा. मेजर वर्षा साठे, इन्स्ट्रक्टर सोनम उपस्थित होत्या.

या वेळी विद्यार्थिनींनी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासनांच्या प्रात्यक्षिकामध्ये उत्साहपूर्वक सहभाग घेतला. या वेळी विविध प्रकारची आसने आणि प्राणायाम करवून घेण्यात आला.

प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. अनिल घस्ते, प्रा. रेखा पंडित, योग विभागाच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. या वेळी दोनशेहून अधिक विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EYZTBD
Similar Posts
कमला महाविद्यालयात नवीन विद्यार्थिनींसाठी स्वागत कार्यक्रम ‘विद्यार्थिनींनी ताराराणी विद्यापीठाचा वारसा समजून घेऊन, तो जतन करावा,’ असे आवाहन विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये नवागत विद्यार्थिनींच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कोल्हापूर  : पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे
सरोजिनीदेवी पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठ संस्थेच्या माजी उपाध्यक्ष दिवंगत सरोजिनीदेवी यांच्या ४८व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा विद्यार्थी केंद्रित’ कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या वेळी माजी बी.सी.यू.डी. डॉ. डी. आर. मोरे म्हणाले, ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा हा विद्यार्थी केंद्रित व हिताचा आहे.’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language